मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. मी विचारलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली नाहीत तर, जनआक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला.
काय आहेत राजू शेट्टींचे प्रश्न
1) कामगार कल्याण मंडळातून किती लाभार्थ्यांना डिबीटीद्वारे पैसे दिले?
२) पीकविम्यात झालेल्या भ्रष्टाचाराची सरकार माहिती देणार का?
3) पाशा पटेल यांनी कृषीमूल्य आयोगाला केलेल्या शिफारसी योग्य आहेत का?
4) 'कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एसटीबीटी बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करु' याचे उत्तर देणार का?
5) एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर काय कारवाई करणार?
6) भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात घेतल्याबद्दल बोलणार का?
7) धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिले का?
8) लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण, स्वतंत्र धर्माचा दर्जा कधी देणार?
9) मेगा नोकरभरतीचे काय झाले?
10) कंत्राटी कामगारांबाबत धोरण काय?
11) कृषी वीज जोडणीत शेतकऱ्यांना लावलेला वीज दर योग्य आहेत का?