महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझं घर बळीराजाच्या काळजातंच, नव्या उमेदीनं पुन्हा मैदानात उतरणार' - poem

राजू शेट्टींनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक कविता शेअर करत 'मी संत नाही शांत आहे' असे म्हणत पराभवाने खचलो नसल्याचे सांगितले आहे.

माझं घर बळीराजाच्या काळजातचं - राजू शेट्टी

By

Published : May 27, 2019, 9:01 PM IST

Updated : May 27, 2019, 11:48 PM IST

मुंबई -माजी खासदार राजू शेट्टींनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक कविता शेअर करत 'मी संत नाही शांत आहे' असे म्हणत पराभवाने खचलो नसल्याचे सांगितले आहे. शेतकरी चळवळीचा घेतलेला वसा पुढे चालण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

'आजपासून' या शिर्षकाच्या कवितेद्वारे त्यांनी शेतकऱ्यांसाठीचा लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने चळवळ पुढे चालवणार असल्याचे सांगितले. गोतावळ्यातून दुरावलो आहे, त्याची खंत मनात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मी खचलो नसून, थोडासा टिचलो आहे. मी बळीराजाच्या काळजात घर करुन बसलो आहे असे त्यांनी म्हटले आहे. आजपासून पुन्हा गोरगरिबांच्या हक्कांसाठी संघर्षाचा नवा अध्याय सुरु करणार असल्याचेही या कवितेतून शेट्टींनी सांगितले आहे.

राजू शेट्टींनी शेअर केलेली कविता

'आजपासून'..

मी संत नाही शांत आहे
गोतावळ्यातून दुरावलो
याची मनात खंत आहे
कट करून गाडलेल्या
बळीचा मी पुत्र आहे
" ज्याला फळं.. त्यालाच दगडं.."
हे जगाचं सूत्र आहे..

मी खचलो नाही
थोडासा टिचलो आहे ..
ते कोण मला बेदखल करणार ?
मी बळीराजाच्या काळजातच
घर करून बसलो आहे ..

म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा
नवा एल्गार करू.. !
गोरगरिबांच्या हक्कासाठी
आजपासून संघर्षाचा
नवा अध्याय सुरू...!!


यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात काही धक्कादायक निकाल लागले. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातही अनपेक्षीत निकाल लागला. येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा पराभव झाला. शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी त्यांचा पराभव केला. मात्र, या पराभवाने खचून न जाता पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे राजू शेट्टींनी दिला आहे.

Last Updated : May 27, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details