महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना अपडेट : राज्यात पहाटे पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - आरोग्यमंत्री - आरोग्यमंत्री पीसी मुंबई

जनता कर्फ्यूला रात्री 9 वाजेपासून उद्या (सोमवारी) सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू वाढवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे, आरोग्यमंत्री
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

By

Published : Mar 22, 2020, 5:44 PM IST

Updated : Mar 22, 2020, 5:52 PM IST

मुंबई -आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आजच्या जनता कर्फ्यूला रात्री 9 वाजेपासून उद्या (सोमवारी) सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू वाढवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य राजेश टोपे यांनी दिली.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -

  • पहाटे 5 नंतर राज्यात कलम 144 लागू
  • कलम 144 लागू शहरी भाग तसेच नगरपंचायतमध्ये लागू
  • कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
  • घेतलेल्या निर्णयाचा गैरफायदा घेऊ नये
  • 'मीच माझा रक्षक' हे लक्षात ठेवा
  • प्रत्येक कार्यालयात 5 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील
  • आज एकाचा मृत्यू मात्र, त्यांना त्यांची मेडीकल हिस्ट्री पाहता त्यांना मोठ्या प्रमाणात मधुमेह तसेच हृदयाचा आजार असल्याची माहिती
  • संशयित आणि पॉझिटिव्ह यांचे मनोबल वाढण्याचे काम करावे
  • कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेले नाही... सोशल डिस्टन्स ठेवावे... घाबरून जाऊ नये
  • महाराष्ट्रातील जनतेचे आभार
  • आज रक्तसाठा आहे...मात्र, पुढील परिस्थिती बघता तो वाढवणे गरजेचे
  • नियमित रक्तदान करणाऱ्यांनीही शिस्तित 10-20 लोकांच्या सहभागाने रक्तदान करावे
  • आतापर्यंत 1876 जणांची नियमित तपासणी, त्यातील 1592 निगेटीव्ह, 74 पॉझिटिव्ह तर 210 उरलेल्यांचे अहवाल बाकी आहेत.
  • गरज पडल्यास काही सीमा सुद्धा बंद करण्यात येतील
Last Updated : Mar 22, 2020, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details