मुंबई -भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष माझ्यासाठी सारखेच असल्याची प्रतिक्रीया गावित यांनी यावेळी दिली.
राजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याचे केले वक्तव्य - rajendra gavit
गेल्या ७ महिन्याच्या काळात या मतदारसंघात काम करायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच ही संधी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राजेंद्र गावित म्हणाले.

शिवसेनेच्या वाट्याला पालघर मतदारसंघ आलेला आहे. गेल्या ७ महिन्याच्या काळात या मतदारसंघात काम करायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच ही संधी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राजेंद्र गावित म्हणाले.
मी आणि माझ्या कुटुंबियांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मी जिल्ह्यात काम करून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे श्रीनिवास वनगा म्हणाले. देशात आणि राज्यात युतीचे सरकार येण्यासाठी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याची मागणी श्रीनिवास वनगा यांनी केली. तसेच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी वनगा यांना देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.