मुंबई -ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरपीआय गवई गटनेते डॉ राजेंद्र गवई म्हणाले शरद पवार म्हणाले की, मताचे विभाजन करून भाजप शिवसेनेला सहकार्य करू नका. त्यामुळे गवई परिवाराने २५ वर्षांनंतर अमरावतीची निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब आंबेडकर यांचे जे चाललंय ते शिवसेना भाजप साठी पूरक आहे. अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.
बाळासाहेब आंबेडकर यांचे जे चाललंय ते शिवसेना-भाजपसाठी पूरक - डॉ. राजेंद्र गवई
प्रकाश आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. पण हे काय चालले आहे ते केवळ भाजप शिवसेना उमेदवारासाठी आहे, असे राजेंद्र गवई म्हणाले. भाजप आणि शिवसेना डोक्यांनी काम करतात. बाबासाहेब आंबेडकर यांचा सैनिक कदापिही भाजप आणि शिवसेनेला मतदान करत नाही.
प्रकाश आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. पण हे काय चालले आहे ते केवळ भाजप शिवसेना उमेदवारासाठी आहे, असे राजेंद्र गवई म्हणाले. भाजप आणि शिवसेना डोक्यांनी काम करतात. बाबासाहेब आंबेडकर यांचा सैनिक कदापिही भाजप आणि शिवसेनेला मतदान करत नाही, पण यातून त्यांचा डाव साधला जात आहे. आम्ही मतविभाजन करून नुकसान करत आहोत. ते सतेत आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र संविधान बदलाची भाषा करतात. आज सर्व समाज धर्म सुखी आहेत. मात्र, याना दंगल आणि भांडण एकमेकात लावणे हेच काम आहे. पाचवर्षातील कोणतेही काम पूर्ण नकरता पोकळ आश्वासने दिली. मताचे विभाजन झाले तर जे आपणाला नाही पाहिजे. ते भावनिक होऊन मत मागणार आहेत. सर्वांनी सावध राहा असे राजेंद्र गवई म्हणाले