मुंबई - देशातील अनेक शहर सध्या वायु प्रदुषणाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे दिवसेंदिवस वायु प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषणाची चिंता भेडसावत असलेल्या एका चाळीस वर्षीय तरुणाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. राजीव कुमार असे या व्यक्तीचे नाव असून ते सायकलीचे महत्व समजावण्यासाठी विशेष ९ फुटी सायकलीवरून देशभर जनजागृती करत आहे.
9 फुटी सायकलवरून देशभर भम्रंती ; राजीव देत आहेत पर्यावरणाचा संदेश - message of environmental protection
गेल्या २५ वर्षांपासून राजीव कुमार वर्षातून एकदा विविध शहरांना भेट देतात. मंगळवारी त्यांनी गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. अभिनेता सलमान खानला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. नुकताच त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोमध्ये आपल्या या उपक्रमाची माहिती दिली आहे.
राजीव कुमार हे मूळ चंदिगडचे आहेत. १९९५ मध्ये राजीव कुमार यांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून पर्यावरण जनजागृती मोहीम सुरू केली. वाहनांच्या इंधनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सायकल सर्वोत्तम पर्याय आहे. याचे महत्व पटवून देण्यासाठी ते सायकलवरून प्रवास करतात. सामाजिक संदेश देण्यासाठी सध्या त्यांनी नऊ फुटी उंच खास सायकल बनवली आहे. या सायकलीने त्यांनी चंदीगड ते मुंबई हा प्रवास केला आहे.
त्यांनी याआधी केलेल्या अनेक मोहिमांची दखल इंडिया रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड यांनी घेतली आहे. आता ते काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करुन गिनीस बुक रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणार आहेत. या आगळ्यावेगळ्या सायकलसाठी एक लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून राजीव कुमार वर्षातून एकदा विविध शहरांना भेट देतात. मंगळवारी त्यांनी गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. अभिनेता सलमान खानला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. नुकताच त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोमध्ये आपल्या या उपक्रमाची माहिती दिली आहे.