मुंबई -मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दिल्ली-मुंबई धावणारी राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा नाही, तर तब्बल चार वेळा चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेतलेला आहे.
मध्य रेल्वे वरिष्ठ पीआरओ ए.के. सिंह पूर्वी ही गाडी आठवड्यातून दोनदा धावत असल्यामुळे मुंबईत नाशिक कडून नवी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन ही एक्सप्रेस आता आठवड्यातून चार वेळा चालण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे वरिष्ठ पीआरओ ए.के. सिंह यांनी दिली आहे.
हेही वाचा - शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मुंबई सीएसटीएमहून हजरत निजामुद्दीनला जाणारी 22 221, 22 222 राजधानी एक्सप्रेस आठवड्यातील सर्व दिवस प्रवाशांच्या सेवेत सुरू करावी व ती मनमाड स्थानकावर थांबावी याकरिता प्रवाशांनी मागणी केली होती. राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोन वेळा म्हणजेच मुंबईहून बुधवारी आणि शनिवारी व हजरत निजामुद्दीनहून गुरुवारी आणि रविवारी अशी सुरू होती.
त्याअनुषंगाने मुंबई ते दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावणारी प्रीमियम राजधानी एक्सप्रेस आता चार दिवस प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या गाडीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने मध्यरेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा - ज्वेलरी उद्योगाला मंदीची मोठी झळ, हजारो कुशल कारागिरांचे रोजगार संकटात
जानेवारी महिन्यापासून मुंबई ते दिल्ली दरम्यान राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यात आली असताना ती आठवड्यातून दोनच दिवस मुंबई ते दिल्ली प्रवासाचे अंतर 20 तासांत पार करत होती. मात्र पुल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यानंतर हे अंतर 20 तासाहून अवघ्या 16 तासांवर आले होते.
परिणामी कमी खर्चात आणि कमी वेळेत मुंबईसह नाशिक, मनमाड, जळगाव आणि भोपाळकरांना सहज शक्य झाले होते. त्यामुळे या मार्गावरील राजधानी एक्सप्रेसच्या फेऱ्यात वाढ होण्याची गरज निर्माण झाली होती. परंतु, रेक अभावी हे काम रखडले गेले होते. तेच काम पश्चिम रेल्वेकडून नुकतेच 20 कोचचा रेक मध्यरेल्वेला उपलब्ध झाल्याने राजधानीच्या फेऱ्यात वाढ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्री लवकरच शुभारंभ करून येत्या पुढील पंधरा दिवसांत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा - बारामतीत रंगणार क्रिकेटचे सामने; राज्यस्तरीयसह रणजी सामन्यांसाठी बीसीसीआयचा हिरवा कंदिल