मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात येणार असून त्याच्या जागी सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या संदर्भातल्या वृत्ताचे आज राजभवनाकडूनच खंडन करण्यात आले आहे.
Maharashtra Governor Change: राज्यपाल बदलाच्या वृत्ताचे राजभावनाकडून खंडन
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात येणार असून त्याच्या जागी सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या संदर्भातल्या वृत्ताचे आज राजभवनाकडूनच खंडन करण्यात आले आहे.
भगत सिंह कोश्यारी
राजभवनाने महाराष्ट्राच्या राज्यपालांना हटवण्याच्या चर्चेला अफवा असल्याचे म्हटले आहे. आम्हाला राष्ट्रपती भवन किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रात नवीन राज्यपालांच्या नियुक्तीबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. सध्याच्या गव्हर्नरचा कार्यकाळ जवळपास 2 वर्षे बाकी आहे, असे राजभवनाने म्हटले आहे.