मुंबई -वादग्रस्त आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृतदेहाशेजारी इतर रुग्णांवर उपचार होत आहेत, असा व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. त्या घटनेनंतर सायन रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली होती. आता विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालयात ही तसाच प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ राणे यांनी समोर आणला आहे. परंतु, राजावाडी प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे.
नितेश राणे यांच्या व्हिडिओत तथ्य नाही; राजावाडी रुग्णालयाचे स्पष्टीकरण - mumbai covid hospital update
पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे लगेच मृतदेह लगेच नेता येत नाही. तो कित्येक तास मृतदेह पडून होता, यात तथ्य नाही. अर्धा ते पाऊस तास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागतो, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.
राजावाडी रुग्णालयात जर असा प्रकार घडला असेल तर तो धक्कादायक आहे, असे यानिमित्ताने बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या व्हिडिओ वर सोशल माध्यमात संताप व्यक्त केला जात आहे.