मुंबई: शहरात फसवणूक करणारे दिवसेंदिवस नवीन नवीन शक्कल लढवून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक करणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या-आवळण्यात पथकाला यश आले. ऑनलाईन टास्क प्रकरणांमध्ये तिघांना अटक केली आहे. ज्यांची नावे कल्पेश मेढेकर (वय २७), मनोज नेरुरकर (३८) आणि सुभाष नागम (४५) अशी असून त्यांनी घाटकोपरमधील व्यक्तीला व्हॉट्सअॅपमार्फत गुंतवणूक करायचे आमिष दाखवत सुरुवातीला फायदा मिळवून दिला. नंतर त्यांना १० लाख ८७ हजार रुपयांना फसवण्यात आले.
राजस्थानी टोळीला अटक: आरोपीचा तपास पोलिस निरीक्षक शीतल मुंढे करत आहेत. त्यांच्याकडून इम्पोर्टर एक्सपोर्टर कोडच्या सर्टिफिकेट झेरॉक्स प्रती, जीएसटी प्रमाणपत्राच्या प्रती, २१ चेक बुक ४३ विविध कंपन्यांचे स्टॅम्प, १३ आधार कार्डच्या झेरॉक्स व पॅन कार्ड झेरॉक्स हस्तगत करण्यात आली. मोठ्या शिताफीने पूर्व विभाग सायबर पोलिसांनी राजस्थानी टोळीला अटक केली. नोकरीची जाहिरात करत या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे.
लाइक्सच्या ५०-१०० साठी लाइफची कमाई गमवाली :कुलाबा पोलिसांच्या हद्दीतही व्हिडीओ लाईकसाठी एका इंटेरियर मॅनेजरला ऑनलाइन टास्क रोड यूट्यूब लाईकच्या देत फसवणूक केली. यामाध्यमातून जवळपास २५ लाख ३५ हजार ७५० रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. मिलिंद शेट्टे (वय ५५), गोरबहादूर सिंग (५२), संतोष शेट्टे (४८), लक्ष्मण सीमा (३७), गुप्ता खान आणि तुषार आजवानी (३८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपास अधिकारी समीर लोणकर आणि प्रकाश गवळी व पथक करत आहे.