मुंबई- भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्तेसाठी विरोधकांना टार्गेट करून संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर कसाही करू शकते, असा आरोप शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. भाजपने काँग्रेसचे 45 जण साम, दाम, दंड, भेद वापरूनच फोडले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे काँग्रेसचे नेते राजन भोसले यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य - राजन भोसले - भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे काँग्रेसचे नेते राजन भोसले यांनी म्हटले आहे.

सत्तेवरून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष इतका इर्षेला पेटला आहे, त्यामुळे युती होईल की नाही याबाबतची शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. मात्र, सद्याच्या घडीला भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करण्याची शक्यता देखील नसल्याचे राजकिय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सर्वच राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी आज ओला दुष्काळ दौऱ्याकडे मोर्चा वळवला आहे. तरी येत्या एक दोन दिवसात महाराष्ट्रच्या राजकारणात मोठे बदल व घडामोडी पाहायला मिळतील. सत्ता स्थापनेसाठी भाजप कोणत्या कुरघोडी करते व शिवसेना आपल्या भूमिकेवरून भाजपवर किती दबावतंत्र अजून आणते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
TAGGED:
शिवसेना आणि भाजप