महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raja Thakur Wife Allegation: संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड ठरवून बदनाम केले; राजा ठाकूर यांच्या पत्नीचा आरोप

मला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर यांना दिली आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपावरून राजा ठाकूर यांच्या पत्नी अ‍ॅड. पूजा ठाकूर यांनी सांगितले की, माझ्या पतीवर आरोप करून त्यांना गुंड ठरवत बदनाम केले जात आहे. आरोप करणे थांबवले नाही तर मी उच्च न्यायालयात जाणार असे त्यांनी सांगितले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 22, 2023, 6:06 PM IST

Updated : Feb 22, 2023, 8:20 PM IST

अ‍ॅड. पूजा ठाकूर प्रतिक्रिया व्यक्त करताना

मुंबई:ठाण्यामधील कथित राजा ठाकूर या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. आणि तसे पत्र देखील त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्तांना दिले. तसेच ठाण्यातील पोलिसांनी त्याबाबत संजय राऊत यांचे स्टेटमेंट घेण्याची देखील तयारी सुरू केली. मात्र या सर्व प्रकरणांमध्ये कथित राजा ठाकूर यांच्या पत्नी अ‍ॅड. पूजा ठाकूर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. निराधार आरोप करणे थांबवावे अन्यथा उच्च न्यायालयामध्ये जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


काय म्हणाल्या पूजा ठाकूर? : मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या राजा ठाकूर यांच्या पत्नी अ‍ॅड. पूजा ठाकूर यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, संजय राऊत यांनी निराधार रीतीने माझ्या पतीला गुंड असे म्हटलेले आहे. ते म्हणायला नको पाहिजे होते. त्यांनी असा आरोप करायला नको पाहिजे. संजय राऊत यांनी माझ्या पतीवर आरोप करणे थांबवावे अन्यथा मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे. मी सध्या पोलिसांकडे तक्रार तर केलेली आहे. आमचा काहीही संबंध या राजकारणाशी नाही, यामुळे आरोप करणे थांबवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.


राऊतांचा काय आहे आरोप? : खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिलेली आहे. आणि ती सुपारी राजा ठाकूर या व्यक्तीला दिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हा आरोप केल्यानंतर त्यांनी त्याबद्दलचे ठाण्यातील पोलिसांकडे तसे पत्र देखील दिले त्यामुळे आता नवीन एक वाद उभा राहिलेला आहे.


आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चा: सत्ता संघर्षाची न्यायालयीन सुनावणी सुरू असताना राज्यातील प्रत्येक प्रभाग विधानसभा आणि लोकसभा या सर्वच मतदारसंघांमध्ये आता ही लढाई पोहोचलेली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या कथित संदर्भातली सुपारी राजा ठाकूर यांना दिली आणि ती सुपारी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचा खळबळ जनक आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चा तर होत आहे.

राऊतांच्या सुरक्षेत वाढ: खासदार संजय राऊत यांच्या या खळबळजनक आरोपानंतर राज्याच्या पोलिस विभागाने संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत नाशिक येथे पक्षाच्या कामकाजानिमित्त गेले असताना त्यांना हा अतिरिक्त बंदोबस्त देखील पुरवला.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी: सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयांमध्ये दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सुरू आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेनेची पक्ष संघटना कोणाच्या हाती राहिली पाहिजे. याबाबतचा हा संघर्ष अवघा देश रोज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी मधून पाहत आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये रोज अनेक नवे नवे वाद आणि खळबळ जनक गौप्यस्फोट समोर येत आहे.

हेही वाचा:Kirit Somaiya Letter to EC: किरीट सोमैया यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र; संजय राऊत यांच्या '2000 कोटीच्या' आरोपाची दखल घेण्याची मागणी

Last Updated : Feb 22, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details