मुंबई - राजा ढाले यांचे विक्रोळी येथील घरी सोमवारी रिपब्लिकन पक्षाचे नेते अविनाश महातेकर सामाजिक न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र यांनी कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली व आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंबेडकर चळवळीत राजा ढालेंचे नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल - अविनाश महातेकर - passes away
राजा ढाले यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी सोमवारी ढाले यांच्या परिवाराची भेट घेतली आणि दलित पँथरचे नेते राजा ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ मोठे नुकसान झाले असून ही बातमी मनाला क्लेश देणारी आहे, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजा ढाले यांच्या निधनाची बातमी समजली, ही निश्चितच दुर्दैवी घटना आहे. आज आंबेडकरी चळवळीने एका पँथर गमावला आहे. राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील एक मोठे नाव होते. बाबासाहेब आंबेडकरांचीही वैचारिक चळवळ होती त्या चळवळीमध्ये ढाले यांचं नाव सोन्याच्या अक्षराने लिहिले जाईल इतके मोठे त्यांचे कार्य आहे. सत्तरच्या दशकात रिपब्लिकन चळवळीला मरगळ आली होती त्यावेळी ढाले यांनी अतिशय गंभीरपणे लढा दिला होता. यावेळी तत्कालीन सरकारवर मोठी नामुष्की ओढवली होती. राजा ढाले, नामदेव ढसाळ यांनी जी भूमिका घेतली होती त्यानंतर पँथर अस्तित्वात आली आणि मोठ्या प्रमाणात सर्व आंबेडकरी तरुण एकत्र होत रस्त्यावर उतरले व त्यामुळे चळवळीला एक मोठा आधार मिळाला. राजा ढाले यांची तर्कशास्त्रावर मोठी पकड होती. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या बुद्ध तत्वज्ञानाला समजवायला सुरुवात केली आणि समाजाला एक चांगला आकार देण्याचे काम केले होते. आज राजा ढाले जगात नसणे ही गोष्ट मनाला क्लेश देणारी आहे. आज त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ मोठे नुकसान झाले आहे असेही महातेकर म्हणाले.