महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरेंनी दिल्या कलानगरमधील आठवणींना उजाळा - family

प्रल्हाद धौंड यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त व धवलरेषा या ग्रंथाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राजकीय नेता म्हणून नव्हे तर कला नगरमधील एक कुटुंबीय म्हणून या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारल्याचे राज म्हणाले.

राज ठाकरेंनी दिल्या कलानगरमधील आठवणींना उजाळा

By

Published : Jun 11, 2019, 9:59 PM IST

मुंबई - कला नगरीच्या वातावरण खूप बदल झाले आहेत, पूर्वी कोणाच्या घरी सहज ये-जा होत असे. कला नगरमधील कलाकारांमुळे माझ्यातील कलावंत घडला. नकळतपणे माझ्यावर तिथे संस्कार होत गेले, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. दिवंगत प्रोफेसर व प्रख्यात चित्रकार प्रल्हाद धौंड यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले, यावेळी त्यांनी कला नगरमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

राज ठाकरेंनी दिल्या कलानगरमधील आठवणींना उजाळा

दिवंगत प्रोफेसर प्रल्हाद धौंड यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त व धवलरेषा या ग्रंथाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राजकीय नेता म्हणून नव्हे तर कला नगरमधील एक कुटुंबीय म्हणून या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारल्याचे राज म्हणाले. कला नगरमध्ये जो काळ गेला तो वेगळा ठरला. तिथे माझे दुसरे घर हे भाईंचे (प्रल्हाद धौंड) घर होते. यावेळी खूप वर्षांनंतर कलानगर मधील कलाकार असलेल्या अनेक कुटुंबीयांची राज ठाकरे यांनी भेट घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details