मुंबई - दक्षिणेत सुरू असलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाच्या वादामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. यावर मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी 'हिंदी राष्ट्रभाषा नाही, उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका' असे मनसेच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
'हिंदी' ही राष्ट्रभाषा नाहीच, उगाच लादून माथी भडकावू नका; मनसेचा मोदी सरकारला इशारा - मनसे
दक्षिणेत सुरू असलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाच्या वादामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. यावर मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी 'हिंदी राष्ट्रभाषा नाही, उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका' असे मनसेच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
हिंदी भाषेच्या मुद्याला देशभरातून प्रखर विरोध करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने तमिळनाडूने कडाडून विरोध केला आहे. आता महाराष्ट्रातूनही मनसेने या मुद्याला विरोध केला आहे. तसेच कर्नाटकचे सिद्धरामय्या यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी लादली जात आहे. हे आमच्या भावनेच्याविरोधात असल्याचे म्हटले आहे. प्रादेशिक अस्मितेच्या बाबतीत काही जणांची वृत्ती धरसोडीची राहिली, तर हिंदीची सक्ती करणे हा राज्यांवर करण्यात आलेला अमानुष हल्लाच म्हणावा लागेल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.