मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Rally In Mulund ) यांनी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर घे भरारी अभियान ( MNS Ghe Bharari Campaign ) राबवणार आहे. याअंतर्गत मनसेचे नेते प्रत्येक विधानसभा मतदार संघात सभा, बैठका घेणार आहेत. आता या अभियानाच्या पहिल्या सभेची तारीख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( Maharashtra Navnirman Sena Campaign ) जाहीर करण्यात आली आहे. या अभियानाची पहिली सभा 6 जानेवारीला मुंबईतील मुलुंड येथे होणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभामनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत घे भरारी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी सभा, बैठका घ्यायच्या आहेत. मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून केला जात आहे. लोकांच्या मुलभूत समस्यांबाबत जनजागृती आणि त्यासाठी आवाज उठवण्यासाठी घे भरारी अभियान राबविण्यात येणार असल्याची मनसेतील सूत्रांनी दिली आहे.