मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व विरोधकांनी टीका केली होती. नुकतीच राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ राज ठाकरे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ईव्हीएमबाबत भेट घेणार आहेत.
'ईव्हीएम'विरोधात राज ठाकरे घेणार ममता दीदींची भेट - राज ठाकरे
ईव्हीएमविरोधात राज ठाकरे सर्व विरोधी पक्ष अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे समजते. नवी दिल्लीत राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.
ईव्हीएम
ईव्हीएमविरोधात राज ठाकरे सर्व विरोधी पक्ष अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे समजते. नवी दिल्लीत राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.
पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष सुरू असताना राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत राज ठाकरेंनी ममता बनर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. आता राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएमविरोधात वातावरण तापवणार आहेत.