मुंबई - ईडीच्या कार्यालयात आल्यापासून शांत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ सोमवारी धडाडणार आहे. वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये आयोजित कार्यकर्त्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आणि मनसेच्या इच्छुक उमेदवारांची यादी देखील मेळाव्यात जाहीर होणार आहे.
मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार - विधानसभा निवडणुका 2019
सोमवारी वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये आयोजित कार्यकर्त्या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
![मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4586129-thumbnail-3x2-raj.jpg)
हेही वाचा - 'शहा'स्तेखानाची बोटं, ईडीमहालातील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष; राष्ट्रवादीकडून भाजपविरोधी व्यंगचित्र
मनसेच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मनसेच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी मनसेने तयार केली आहे. राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी पहिल्यांदाच सर्व इच्छुक उमेदवारांना संबोधीत करणार आहेत. मनसे शंभर ते 125 जागा लढविण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत मनसे विधानसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.