मुंबई - नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम 'व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा' या बॅनरखाली सर्व विरोधकांना एकत्र करत ईव्हीएम विरोधात रणशिंग फुकले आहे. आता उद्या ५ ऑगस्ट रोजी सोमवारी रंगशारदा येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे हे आपल्या पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.
५ ऑगस्टच्या मेळाव्यात राज ठाकरे स्पष्ट करणार मनसेची भूमिका - mumbai
नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम 'व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा' या बॅनरखाली सर्व विरोधकांना एकत्र करत ईव्हीएम विरोधात रणशिंग फुकले आहे. आता येत्या सोमवारी रंगशारदा, मुंबई येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे हे आपल्या पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आणि 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप व मोदी सरकार विरोधात तोफ डागली होती. यानंतर पुन्हा आता लोकसभा निवडणुकीनंतर राज यांनी 'ईव्हीएम' विरोधात लढाई सुरू केली आहे.
आता मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार की आघाडी सोबत जाणार, हे येत्या सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.