मुंबई :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या ऑपरेशन नंतर ते लगेचच विदर्भ दौरा, कोकण दौरा आणि सोबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मात्र, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मनसेचे विविध नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात काही नेते पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील माध्यमांसमोर व्यक्त करत आहेत. अशा मनसेतील वाचाळ वीरांना आता थेट राज ठाकरे यांनीच ताकीत (Raj Thackeray Warns To MNS Party Leaders) दिली असून; ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे, असा इशाराच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे हेदेखील वारंवार सोशल मीडियावरून वेगवेगळ्या मागण्या करतात, पक्षांतर्गत बाबीवर बोलतात लाईव्ह करतात अशी चर्चा पुण्यात आहे. त्यामुळे हा वसंत मोरे (Vasant More) यांना इशारा असल्याच्या चर्चा सध्या पुण्यामध्ये चालू झाले आहेत.
राज ठाकरेंचे पत्र :राज ठाकरे यांनी मनसे पक्ष वाढवण्यासाठी कोकण विदर्भात दौरे केले होते. त्यानंतर अनेक जिल्ह्यात सुद्धा पक्षांतर्गत नाराजी दिसून येत होती. पण ती पक्षापर्यंत पोहोचत नव्हती, ते वेगळ्या माध्यमातून सोशल माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते पोहोचवत होते. त्यामुळे पक्षाची एक प्रकारे बदनामी होऊ शकते हा विचार करून हे पत्र राज ठाकरे यांनी काढले आहे.
हे सगळे शेफरले आहेत :आपल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलंय की, 'सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची (Over Social Media Post Media Appearance) असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.'
तर आधी राजीनामा द्या :आपल्या पत्रात राज ठाकरे यांनी पुढे म्हटलंय की, 'माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार
केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या', असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हणटले.
पक्षांतील अंतर्गत बाबी सोशल मीडिया अथवा माध्यमांशी बोलल्या तर कारवाई करण्याचे संकेत दिले पुण्यातील नेते नुकतेच वसंत मोरेंनी फेसबुकच्या माध्यमातून आप्पा आखंडेंना पद देण्याची मागणी केली होती त्या संदर्भात सुद्धा हे पत्र असल्याची चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू असून वसंत मोरे हे खरंतर सोशल माध्यमातून आणि प्रसार माध्यमात सुद्धा अनेक वेळा आपली भूमिका बेधडकपणे मांडत असतात त्यामुळे त्यांच्या विषयाला धरून तर हे पत्र नाही का अशी चर्चा सुद्धा पुण्यामध्ये होत आहे.