मुंबई Raj Thackrey Met Uddhav Thackrey : विविध कारणांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेता, कार्यकर्ता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. दुसरीकडं राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, अशी देखील महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आणि मनसैनिकांची भावना आहे. मागील काही महिन्यांपूर्वी हे दोघं भाऊ एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. दरम्यान, आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एका कौटुंबिक कार्यक्रमात भेटल्यामुळे हे दोघं भाऊ एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय.
दोघांचं भेटीचं कारण काय : राज आणि उद्धव ठाकरे हे घरच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण जयजयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांचा साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. तसंच हस्तांदोलनही केलं. यश देशपांडे यांच्या साखरपुड्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं.
उद्धव-राज एकत्र येणार ? : मुंबईतल्या दादर परिसरात हा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. मात्र, राज आणि उद्धव एकत्र आल्याचं पाहायला मिळलं. यामुळं उद्धव-राज हे एकत्र येणार का? या चर्चेचं दळण पुन्हा दळलं जायला सुरुवात झालीय. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं, अशी भावना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळं या भेटीनंतर उद्धव-राज आगामी काळात एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - ठाकरे बंधू
Raj Thackrey Met Uddhav Thackrey : मुंबईच्या दादर परिसरात राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
Published : Dec 22, 2023, 3:35 PM IST
|Updated : Dec 22, 2023, 5:11 PM IST
यापूर्वीही अनेकदा भेटी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि यांच्यात कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त वरचेवर भेटी होत असतात. मात्र राजकारणाच्या मैदानात हे एकमेकांचे विरोधक आहेत. याआधी अनेकदा दोघांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र या दोन्ही भावाची राजकीय युती होऊ शकली नाही. मात्र राजकारणात अशक्य असं काहीही नाही, याची प्रचिती येऊ शकते, अशी आशा दोन्ही पक्षांच्या असंख्य समर्थकांना वाटतेय.
हेही वाचा :