मुंबई - एका अंतर्गत चाचणीचा भाग म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. या कामगिरीसाठी वैज्ञानिक अभिनंदनास पात्र आहेत. अभिमान बाळगावा अशी ही कामगिरी आहे. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी याविषयी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्राला संबोधित करण्याची गरज होती का, राज ठाकरेंचा खडा सवाल
क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंच पंतप्रधानांवर ट्विटास्त्र
राज ठाकरेंप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील इतर अनेक नेत्यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. डीआरडीओने खूप छान काम केले. त्यांच्याविषयी अभिमान वाटत आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनाही जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' असे उपरोधिकट्विट राहुल गांधींनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी डीआरडीओच्या यशाची देशाला माहिती देतानाही त्याचाही राजकीय वापर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींची आजची घोषणा म्हणजे नाटकबाजी आणि जाहिरातबाजीच्या सर्व सीमा पार झाल्या आहेत. निवडणूक तोंडावर आली असताना डीआरडीओच्या कार्याचे श्रेय मोदी स्वतः लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी आणिसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीहीया घटनेवरून मोदींवर टीका केली आहे. डीआरडीओच्या यशाची घोषणा करताना मोदींनी स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. अशी संधी सोडतील, ते मोदी कसले? हे त्यांचे नेहमीचेच झाले आहे,असे बॅनर्जी म्हणाल्या. हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.