महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवाजी पार्कवर धडाडणार राज ठाकरेंची तोफ? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सभेची जय्यत तयारी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. सांयकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.

राज ठाकरे

By

Published : Apr 5, 2019, 8:07 PM IST

मुंबई - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. सांयकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई शहर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक उद्या राज ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी येणार आहेत.

शिवाजी पार्क मैदान

या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानात आसन व्यवस्था व स्टेज उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर गेल्या जाहीर सभेत टीकेची झोड उठवल्यानंतर राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या विषयावर राज ठाकरे फटकेबाजी करतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details