महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘हर हर महादेवबाबत बोलू नका, राज ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना आदेश

हर हर महादेव चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ( Raj Thackeray order to MNS spokespersons ) ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्रकरणाला राष्ट्रवादीकडून ( Har Har Mahadev Movie ) जातीय रंग दिला जात असल्याने काहीच न बोलण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.

By

Published : Nov 8, 2022, 9:46 AM IST

Updated : Nov 8, 2022, 11:11 AM IST

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई : हर हर महादेव चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ( Raj Thackeray order to MNS spokespersons ) ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्रकरणाला राष्ट्रवादीकडून ( Har Har Mahadev Movie ) जातीय रंग दिला जात असल्याने काहीच न बोलण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.

पुणे आणि ठाण्यात इतिहासाशी छेडछाड केल्याप्रकरणी 'हर हर महादेव' या चित्रपटाविरोधात सोमवारी काही संघटनांचे लोक रस्त्यावर उतरले. त्यावर टीका करत त्यांनी विरोध केला, त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हर हर महादेव या चित्रपटाचे शो थांबवण्यात आले. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा शो पुन्हा सुरू करण्यास सांगितला यावरून मोठा ( Har Har Mahadev controversy ) वाद झाला. अखेर आता राज ठाकरे यांनी मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांना या चित्रपटाबाबत आपली भूमिका न मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक हेच आपली भूमिका मांडतील असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.



संभाजी राजे छत्रपती यांची तंबीसुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेल्या हा चित्रपट सुरुवातीच्या काही दिवसात चर्चेत होता. त्याला कारण ठरले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांे या चित्रपटात असलेले योगदान. या चित्रपटात जो सह्याद्रीचा आवाज दाखवण्यात आला आहे तो राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर दुसरीकडे काही संघटनांकडून या चित्रपटात इतिहासाचे विद्रूपीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजले जाणारे संभाजी राजे छत्रपती यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.



राज ठाकरे यांचे आदेशया चित्रपटात राज ठाकरे यांचे योगदानामुळे मनसे चे नेते कार्यकर्ते सोशल मीडिया असेल अथवा रस्त्यावर देखील या चित्रपटाचे जोरात प्रमोशन करत आहेत. अनेक कार्यकर्ते सोशल मीडियावर अनेकांशी वाद घालत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी या संदर्भात कोणीही कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे. या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जातोय. त्यामुळे कुणीही काहीही प्रतिक्रिया देऊ नका, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.


दरम्यान वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे भूमिका मांडणार आहेत. आज अंधेरी येथे एक पत्रकार परिषद घेऊन दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आपली भूमिका माध्यमांसमोर ठेवतील. त्यामुळे दिग्दर्शकांच्या या पत्रकार परिषदेनंतर हा वाद थांबतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Last Updated : Nov 8, 2022, 11:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details