महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray On Nanded Death Case : तीन तीन इंजिन लाऊन राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, राज ठाकरेंची खोचक टीका - राज ठाकरे यांनी तोफ डागली

Raj Thackeray On Nanded Death Case : नांदेड इथल्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Raj Thackeray On Nanded Death Case
मनसे प्रमुख राज ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 11:02 AM IST

मुंबई Raj Thackeray On Nanded Death Case :नांदेड इथल्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तोफ डागली आहे. राज्यात तीन तीन इंजिन लाऊन सरकार चावलं जात आहे. मात्र तरीही राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरुन आता चांगलचं राजकारण तापलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे :नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जात असल्याचं कळतंय. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाही, पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारनं स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल याकडं अधिक लक्ष द्यावं, असं राज ठाकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाउंडवर शेयर केलेल्या पोस्टवर नमूद केलं आहे.

काय आहे नांदेड रुग्णांचे मृत्यू प्रकरण :नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. औषधांचा तुटवडा असल्यानं या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. मात्र तेलंगाणा राज्यातील रुग्ण नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्यानं रुग्णांचा भार वाढत आहे. त्यातही हे रुग्ण शेवटच्या क्षणी नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात दाखल होत असल्यानं या रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता आर एस वाकोडे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Nanded Hospital Death : ५०० खाटांच्या रुग्णालयात १२०० रुग्णांवर उपचार सुरु, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस
  2. Sharad Pawar On Nanded Death Case : नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण; हे सरकारी यंत्रणांचं अपयश, शरद पवारांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details