महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray on Marathi Signboards : दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज ठाकरे म्हणाले, मूठभर व्यापाऱ्यांनी... - मराठी पाट्या सर्वोच्च न्यायालय निर्देश

Raj Thackeray on Marathi Signboards : मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. पुढील दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत, असा निकाल न्यायालयानं दिलाय. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 1:10 PM IST

मुंबई : Raj Thackeray on Marathi Signboards :सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी दुकानदारांना नवीन मराठी पाट्या (साईनबोर्ड) लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं. तसेच मराठी पाट्यांसंदर्भात व्यापाऱ्यांना इशारा दिलाय.

न्यायालयाचा महत्वाचा निकाल : न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठानं मराठी पाट्यांसदर्भात निकाल दिलाय. दिवाळी आणि दसऱ्याच्या आधी मराठी पाट्या लावण्यासाठी वेळ दिली आहे. महाराष्ट्रात आहात, मराठी पाट्या असण्याचा फायदा तुम्हाला माहिती नाही का? असा प्रश्न खंडपीठानं विचारला. तसेच येत्या दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मुदत न्यायालानं दिली आहे. मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांच्या महासंघाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निकाल दिलाय.

सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. पोस्टमध्ये ते लिहितात, पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयान्ं दिलाय, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार. 'मराठी पाट्या' या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला, त्याला आजच्या निर्णयानं एक मान्यताच मिळाली.

मूठभर व्यापाऱ्यांनी लढा न्यायालयात नेला : मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे, त्या भाषेत दुकानं, आस्थापनांवर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यात विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे, असे म्हणत राज ठाकरे यांनी व्यापाऱ्यांचे कान टोचले.

मूठभर व्यापाऱ्यांना चपराक : माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयानं पण यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानांवर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसेच दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका, असा इशाराही त्यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. MNS Warning Toll Administration : टोल नाक्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; ...तर आमच्याशी गाठ, टोल प्रशासनाला इशारा
  2. MNS Lok Sabha Preparation: इंजिन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात.. अमित ठाकरेंसह मनसे नेत्यांच्या 'या' मतदारसंघात नियुक्त्या
  3. MNS Warning : सीमा हैदरचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; मनसेनं दिला 'खळ्ळ खट्याक'चा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details