मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील बंगल्यावर आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर काही वेळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बंगल्यावर येऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट 8 मिनिटे चालली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी सकारात्मक चर्चा घडवा, अशी विनंती पवार यांना केली असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - दिल्लीतील बैठकीत सत्तास्थापनेसाठी चर्चा होईल असे वाटत नाही - जयंत पाटील
शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या आठ मिनिटाच्या भेटीमध्ये सुरूवातीला राज्यातील सत्ता स्थापनेवर आणि त्यानंतर दुष्काळावर ही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असून या भेटीवर सर्वाधिक चर्चा झाली असून राज्यात सत्ता स्थापनेसाठी आपणच आता पुढाकार घेऊन त्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणावी अशी विनंती राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - हीच ती वेळ..! शिवसेनेला छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला