मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगांवकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.
राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, महानगरातील समस्यांवर केली चर्चा - संजय बर्वे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महानगरातील समस्यांवर चर्चा केली. भेटीवेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगांवकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.
या भेटीत मुंबईची परिस्थिती, अपघात आणि गुन्हे याबाबत ठाकरेंनी चर्चा केली. तसेच त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. रविवारी मनसेच्यावतीने पत्रक काढून मनसे यावेळी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मनसे आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसणार तरी पक्ष लोकसभेत कोणाला पाठिंबा देणार याबाबतची भूमिका उद्या होणाऱ्या जाहीर सभेत ठाकरे स्पष्ट करतील. यामुळे उद्या ते पुन्हा कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.