महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करकरेंचा अपमान करणाऱया प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी कशी? राज यांचा मोदींना सवाल - shaha

राज ठाकरे यांची आज मालाडमध्ये आठवी सभा चालू आहे.

राज ठाकरे

By

Published : Apr 24, 2019, 8:53 PM IST

Updated : Apr 24, 2019, 11:41 PM IST

मुंबई- मोदी आणि शाहांना सत्तेचा माज आला आहे. त्यामुळे ते बाॅम्ब स्फोटातील आरोपींना तिकीट कशी देतात म्हणात राज ठाकरे यांनी आज पुन्हा जोरदार टीका केली आहे. दररोज प्रत्येक सभांमधून राज ठाकरे सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून आज राज ठाकरे यांची आठवी सभा भांडूपमध्ये पार पडली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे भांडूपमधील सभा

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हेमंत करकरे ज्या प्रकरणाचा तपास करत होते तो बॉम्बस्फोटाचा खटला होता आणि दहशतवादाला धर्म असूच शकत नाही आणि अशा माणसाबद्दल विधान करणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता. हा सत्तेचा माज आहे अशी टीका राज यांनी केली तसेच जेव्हा यांच्यावर टीका सुरू झाली तेव्हा भाजपने हात झटकत सांगितलं की हे विधान आम्हाला मान्य नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाचे समर्थन करतात असही राज यांनी सांगितले.

भाषणातील महत्तवाचे मुद्दे -

  • भाजपपेक्षा केंद्रात काँग्रेसच बरं होत
  • आघाडीपेक्षा भाजप जास्त नालायक आहे
  • किरीट सोमय्या आता चूप का?
  • धोका आहे हे सांगूनही जवानांना त्या रस्त्यावरुन का पाठवलं गेलं.
  • बा्ॅम्ब स्फोटातील आरोपीला तिकीट दिले कसे?
  • पंतप्रधान मोदींच्या गावातला दाखवला व्हिडिओ
  • पाच वर्ष फक्त नेहरु आणि इंदिरा गांधींना नाव ठेवली.
  • मोदी - शाहांना सत्तेचा माज

मोदी आणि शाह सत्तेत नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. यामधून मोदी सरकारच्या योजनांचे ते वाभाडे काढत आहेत. आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावाचा व्हिडिओ दाखवत मोदींनी कशी गावांची वाट लावली हे राज ठाकरेंनी यात दाखवले आहे.

Last Updated : Apr 24, 2019, 11:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details