LIVE (राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे)
- 7.51 pm - 9 फेब्रुवारी रोजी मनसेकडून आझाद मैदानावर बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी मोर्चा काढणार
- 7.50 pm - देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशातून बाहेर हाकलून देण्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा.
- 7.45 pm - झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझे मत तीच आहे जी पूर्वीपासून आहेत. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही.
- 7.42 pm - समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावे लागेल.
- 7.40 pm - धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही. तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही.
- 7.37 pm - सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते.
- 7.34 pm - जे देशाशी प्रामाणिक मुस्लीम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही.
- 7.32 pm - झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालेच होते.
मुंबई- मी धर्मांतर केलेला नाही, मी मराठी आहे आणि मी हिंदूही आहे. मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर, मराठी म्हणून अंगावर जाईन. जर धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर, मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, असे राज ठाकरे म्हणाले.