मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष पुन्हा एकदा सक्रिय व्हावा यासाठी राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा एमआयजी क्लब येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे जेव्हा या बैठकीला पोहचले तेव्हा त्यांच्या डाव्या हाताला सपोटर लावण्यात आला होता. यामुळे राज यांच्या हाताला काय झालं याची चर्चा सुरू झाली. राज यांच्या डाव्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर असून हिंदुजा रुग्णालयात उपचार त्यांनी उपचार घेतले आहेत.
राज ठाकरे यांना काही वर्षांपूर्वी देखील अशाप्रकारे दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांच्या हाताचा सपोर्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.