मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क न घालताच आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मास्क न घालताच राज ठाकरे मंत्रालयात... - मुंबई बातमी
जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरचे रुग्ण मुंबईत झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे मुंबई पालिकेने बंधनकारक केले आहे.
हेही वाचा-लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरचे रुग्ण मुंबईत झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे मुंबई पालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र, या नियमांचे आज राज ठाकरे यांच्याकडूनच उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. याबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारणा केली असता, 'सर्वांनी मास्क घातले होते म्हणून मी घातले नाही' असे मिश्किली शैलीत त्यांनी उत्तर दिले.