मुंबई : शिवसेनेत अंतर्गत फृट पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) प्रत्येक वेळी आपल्या कार्यकर्त्यांना 'महाराष्ट्रात जी काही सध्या परिस्थिती आहे त्याकडे एक संधी म्हणून बघा' असे वेळोवेळी आवाहन करत असतात. त्या दृष्टीने पक्ष मजबूत करण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सात दिवसांचा विदर्भ दौरा केला. त्यानंतर आता राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार Raj thackeray on kokan daura आहेत. 27 तारखेला गोरेगावच्या नेस्को पार्क येथे मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होईल. या मेळाव्यानंतर 28 तारखेला ते कोकण दौऱ्यावर निघतील. सहा दिवस ते कोकणात विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र आघाडीवर -महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यांच्या तुलनेतून उद्योगधंद्यांच्या बाबतीत आघाडीवर आहे आणि उद्याेगपतींची देखील महाराष्ट्र राज्य पहिली पसंती आहे, महाराष्ट्र बाहेर प्रकल्प गेले याविषयाकडे राजकारण म्हणून न पाहता देशाचा विकास होतोय म्हणून पाहिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र बाहेर प्रकल्प गेले याविषयाकडे राजकारण म्हणून न पाहता देशाचा विकास होतोय म्हणून पाहिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
अंबाबाई दर्शन घेऊन पुढे जाणार -आपल्या दौऱ्याबाबत माहिती देताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "आज मुंबईतल्या सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांचे जे काही प्रश्न असतील, मुद्दे असतील ते जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा आजच्या बैठकीत शोधला जाईल. त्यामुळे म्हटले तर आजची बैठक तशी अराजकीय आहे. मात्र, 27 तारखेला गोरेगावच्या नेस्को पार्क येथे सर्व गटाध्यक्षांचा एक मेळावा होईल या मेळाव्यात आम्ही आमची पुढची भूमिका जाहीर करू, त्यानंतर लगेचच 28 तारखेला मी कोकण दौऱ्यावर जाईल. कोल्हापूरला जाऊन आंबा मातेचे दर्शन घेऊन पुढे कोकणच्या दिशेने रवाना होईल." अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
असा असेल राज ठाकरेंचा दौरा - राज ठाकरे यांनी दिलेलता माहितीनुसार, या कोकण दौऱ्याची सुरुवात तळ कोकणापासून करतील. कोल्हापूर मार्गे राज ठाकरे तळ कोकणात प्रवेश करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस वेळ देऊन राज ठाकरे इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची संवाद साधतील. त्यावेळी अनेकांच्या मनसेत प्रवेश देखील होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या उगमस्थानात मनसे -शिवसेनेचा जन्मच मुळात कोकणातून आणि कोकणी माणसांमुळे झाला आहे. आज देखील शिवसेनेत जितके काही पदाधिकारी खासदार, आमदार, नगरसेवक आहेत त्यातले बहुतांश हे कोकणी आहेत. याच कोकणात शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाल्याने मनसे याकडे एक संधी म्हणून पहात असल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शिवसेनेच्या उगम स्थानात मनसेला खरंच पाय रोवता येतील का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
मनसे पूर्ण ताकदीने मैदानात - मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे त्यांच्या पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासोबतच शिवसेनेसह महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी राज ठाकरेंनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे मानले जात आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची माहिती, मनसे नेत्यांनी दिली.
मनसेत इनकमिंग - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात एकीकडे त्यांच्या पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बैठक आणि चर्चा होणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही चर्चा होणार आहे. यासोबतच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मनसेत प्रवेश दिला जाणार आहे.