महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2022, 10:36 AM IST

ETV Bharat / state

Prashant Damle : प्रशांत दामले यांच्या कार्यक्रमात राज ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर; दोघांचीही तुफान फटकेबाजी

मराठी नाटकांना घराघरात पोहोचवणारे प्रख्यात मराठी नाटककार प्रशांत दामले ( Marathi playwright Prashant Damle ) यांनी रविवारी एक नवा विक्रम केला आहे. हा कार्यक्रम सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे चर्चेत आहे.

Prashant Damle
प्रशांत दामले

मुंबई :मराठी नाटकांना घराघरात पोहोचवणारे प्रख्यात मराठी नाटककार प्रशांत दामले ( Marathi playwright Prashant Damle ) यांनी रविवारी एक नवा विक्रम केला आहे. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह ( Shanmukhananda Auditorium ), प्रशांत दामले यांनी त्यांच्या नाटकांचे 12,500 प्रयोग केले आहेत. प्रशांत दामले विक्रम टप्पा पार केला आहे. एक लग्न भी भाई साहित्य या नाटकाचा प्रयोग त्यांनी षण्मुखानंद सभागृहात केला. अशा परिस्थितीत बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन ( Bollywood megastar Amitabh Bachchan ) यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP state president Chandrasekhar Bawankule ) हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे चर्चेत आहे.


उद्धव ठाकरेंना टोला :प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या गौरव सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्ही मराठी नाटक घराघरात पोहोचवत आहात. तुम्ही ज्याप्रमाणे नाटकाचे प्रयोग करता त्याचप्रमाणे आम्ही देखील साडेतीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य केलं त्याचे पडसाद आज देखील उमटताना दिसत आहेत. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यांच्या या भाषणाची चर्चा सध्या सुरू आहे.

राज ठाकरे यांनी केली मुष्कील टिप्पणी : दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. आता प्रशांत दामले यांच्या या विक्रमाच्या निमित्ताने देखील हे तिघही एकाच मंचावर उपस्थित होते. यावरून राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एक मिश्किल वक्तव्य केले. राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे नेहमीच सोबत असतात. मागचे काही दिवस काही कार्यक्रमांना आम्ही तिघे एकत्र होतो. खरं तर आज मी या कार्यक्रमाला येणार नव्हतो पण प्रशांत दामले तुमच्यासाठी आलो. नाहीतर लोकांना वाटायचे इथे एकावर एक फ्री मिळतो की काय? अशी मुश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.


आमच्या हाती घंटा :राज ठाकरे यांच्या सभांना नेहमीच गर्दी झालेली दिसते. त्यांची भाषण देखील सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र, लोकांचा हा प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीत मात्र दिसत नाही. मागच्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सपाटून मार खाल्लेला दिसतो. यावरून देखील राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्याला कारण ठरलं उपस्थित सर्व मान्यवरांना हा एक नाटकाचा विक्रम असल्याने घंटा देण्यात आली. यावरून राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि या निवडणुकीनंतर लोक जे म्हणतात तेच मी म्हणेल आमच्या हाती काय आलं तर घंटा अशी मिश्किल टिपण्णी राज ठाकरे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details