महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray Letter : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी - Raj Thackeray demand through

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं अतोनात नुकसान ( Returning rains hit farmers ) झाले आहे. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा ( Wet drought should be declared ) अशी मागणी राज ठाकरे ( Raj Thackeray's demand to declare wet drought ) यांनी एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे ( Raj Thackeray letter to Eknath Shinde ) केली आहे. या संदर्भातलं ट्विट त्यांनी केले आहे.

aj Thackeray Letter To Eknath Shinde
ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र

By

Published : Oct 20, 2022, 6:27 PM IST

मुंबई -यावर्षी राज्यात मान्सूनचा मुक्काम लाबल्याने परतीच्या पावसाने कहर ( Havoc with return rains ) केला. राज्यात यंदा पाऊस खूप काळ लांबला मान्सून अधिक काळ लांबल्यामुळे परतीच्या पावसाने ( Havoc with return rains ) शेतकऱ्यांना जाता जाता खूप मोठा फटका दिला आहे. ह्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान ( Returning rains hit farmers ) केले आहे. त्यामुळे अद्यापही पाऊस लागण्याची शक्यता असल्याने रब्बी बाबतही शेतकरी चिंता दूर झाला आहे. पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत त्याचं पीक वाया गेला आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेतच, मात्र सरकारने एवढेच न करता सध्याची गंभीर परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरे ( Wet drought should be declared ) यांनी पत्राद्वारे ( Raj Thackeray letter to Eknath Shinde ) केली आहे.

पंचनामे नीट होत नाहीत -राज्य सरकारने प्रथेप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता हे पंचनामे नीट होत नाही आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभही होत नाही त्यामुळे हे पंचनामे नीट होतील याची दक्षता घेऊन सरकारने युद्धपातळीवर या परिस्थितीचा आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रती हेक्टरी नुकसान भरपाई पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा अशी विनंती राज ठाकरे यांनी या पत्रात केली आहे.

दिलासा देऊन दिवाळी साजरी करा -राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या संदर्भात दिलासा देऊन या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी असा सल्लाही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details