महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाविकास आघाडीचा एक मंत्री गर्दी जमवून धुडगूस घालतो मात्र, मराठी भाषा दिन अन् शिवजयंतीला परवानगी नाकारली जाते' - राज ठाकरे शिवजयंती परवानगी प्रतिक्रिया

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या समरणार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. मात्र, या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : Feb 27, 2021, 12:33 PM IST

Updated : Feb 27, 2021, 2:56 PM IST

मुंबई - "महाविकास आघाडीचा एक मंत्री गर्दी जमवून धुडगूस घालतो. त्याला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, कोरोनाचे कारण देऊन मराठी भाषा दिन आणि शिव जयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते" अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. "सरकारला जर कोरोनाची भीती वाटत असेल तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकला” असा खोचक सल्ला राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली

कोरोनाची भीती असेल तर निवडणुकाही पुढे ढकला -

काही दिवसांत राज्यात कल्याण-डोंबिवली, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने राज्यातील विविध पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाचा संसर्गही वाढत असल्यामुळे सरकारने राज्यात अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मनसेने मुंबईतील शिवाजी पार्कवर कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी कोरोनाचे कारण देत या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकला, असा खोचक सल्ला राज्य सरकारला दिला आहे.

Last Updated : Feb 27, 2021, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details