मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकाही प्रश्नाला उत्तर न दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नव्हती, तर मग मोदी पत्रकार परिषदेला कशासाठी आले? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मनसे प्रमुखांनी मोदींचा समाचार घेतला.
मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार - राज ठाकरे - narendra modi
पाच वर्षे सत्ता भोगणारे मोदी, निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाबाबत एका शब्दानेही पत्रकार परिषदेत बोलले नाहीत. ही त्यांची मानसिक हार आहे. यापुढे त्यांची २३ मे रोजी हार होईल, अशा शब्दात राज यांनी मोदींचा समाचार घेतला. मोदींनी असं काय केलं आहे, ज्यामुळे ते इतके पत्रकारांना घाबरतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मोदींची पत्रकार परिषद ही 'मौन की बात' असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

काल शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शाह यांच्यासोबत दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अमित शाह यांनी दिली. मोदींनी मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक असल्याचे सांगत, तुमच्या प्रश्नाचे उत्तर पक्षाचे अध्यक्ष अमित शाह देतील, असे सांगितले. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मागील ५ वर्षांतील पहिलीच पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.