मुंबई - सध्या भारतात 'मोडी' लिपी नाही तर फक्त 'मोदी' लिपी दिसते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अच्युत पालव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
"सध्या भारतात फक्त ‘मोदी’ लिपी दिसते"
अच्युत पालवांचा प्रवास मी खूप वर्षापासून पाहत आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग वेळोवेळी केला आहे. संगणकावर कितीही काम करा पण ओरिजनल ते ओरिजन असते, असे सुंदर लिखाणावर राज म्हणाले.
अच्युत पालवांचा प्रवास मी खूप वर्षांपासून पाहत आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग वेळोवेळी केला आहे. संगणकावर कितीही काम करा पण ओरिजनल ते ओरिजन असते, असे सुंदर लिखाणावर राज म्हणाले.
पुढे बोलताना राज म्हणाले की, अच्युत पालव यांना मी कॉलेज जीवनापासून पाहत आहे. त्यांचा हा प्रवास साधासुधा नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे. चांगले अक्षर असणे या सारखे समाधान नाही. माझे अक्षर माझ्या वडिलांमुळे आणि बाळासाहेब यांच्यामुळे आहे. आज अच्युत पालव यांचे जगात नाव आहे. सध्या भारतात केवळ मोडी लिपी दिसते. माझ्या आजोबांची सही मोडी लिपीत असायची. या प्रवासाबद्दल मी अच्युत पालव यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत उद्घाटनप्रसंगी राज ठाकरे यांनी पालव यांचे कौतुक केले.