महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्ही को-पायलट होता काय ? एअर स्ट्राईकवरुन राज ठाकरेंचा अमित शाहंना टोला - mumbai

आपल्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५० माणसे मारल्याचे अमित शाहंनी सांगितले होते. तुम्ही काय को-पायलट होता काय? असे म्हणत राज यांनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर निशाणा

By

Published : Apr 6, 2019, 11:45 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इअर स्ट्राईकच्या मुद्यावरुन पंतप्रधान मोंदीसह अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५० माणसे मारल्याचे अमित शाहंनी सांगितले होते. तू काय को-पायलट होता काय? असे म्हणत राज यांनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर निशाणा

पुलवामा हल्लयानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला होता. त्यावरुन भाजप सरकार राजकारण करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कीती लोक मारले गेले याची माहिती आमच्याकडे नाही. भाजपला कोठून कळला हा आकडा. यावेळी राज यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा फायदा कोणाला व्हायचा त्याला होऊ द्या. पण आता मोदी शाह ही जोडगोळी देशाला घातक आहे. त्यांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करा असेही राज ठाकरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details