मुंबई- दादर परिसरातील बालमोहन विद्या मंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत मतदान केले. राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे व राज ठाकरे यांच्या मातोश्रींनी तासभर सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहून मतदान केले.
तासभर रांगेत उभे राहून राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क - cast vote
दादर परिसरातील बालमोहन विद्या मंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत मतदान केले
राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
राज ठाकरे यांना मतदानासाठी जवळपास तासभर रांगेत उभे राहावे लागले होते. सकाळी साधारण ११ वाजून ४५ वाजता ते मतदान केंद्रावर आले होते व जवळपास तासभर कुटुंबासह रांगेत उभे राहून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर आल्यावर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे मात्र टाळले.