मुंबई : Raj Thackeray : मराठी असल्यानं मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारल्याचं समोर (Marathi Woman Denied Office Space) आलंय. एका मराठी महिलेला मुलुंडमध्ये व्यावसायिक कामासाठी जागा नाकारण्यात आली होती. आम्ही मराठी माणसांना घर/जागा देत नसल्याचं कारण पुढं करत मराठी महिलेला जागेसाठी नकार दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक (Raj Thackeray Aggressive) होत, संबंधित नागरिकाला समज दिला होता. पंकजा मुंडे यांनाही घर नाकारण्यात आल्याचं आता समोर (Pankaja Munde House Denied) आलंय. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत.
गालावर वळ उठतील : मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहिती नाहीत. त्यामुळं माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीनं दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवानं माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी दिलाय. सरकारनं जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.