महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मोदी है तो मुमकीन है' जाहिरातीतील कुटुंब राज ठाकरेंच्या मंचावर, मोदींचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड

यापूर्वीही राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत मोदी सरकारच्या डिजीटल इंडियाचे वाभाडे काढत 'हरिसाल' या डिजीटल गावाची पोलखोल केली होती.

'मोदी है तो मुमकीन है' जाहिरातीतील कुटुंब

By

Published : Apr 24, 2019, 1:32 AM IST

मुंबई - आम्ही कुठल्याही योजनेचे लाभार्थी नाही. २०१२ मध्ये गिरगावसंबंधी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी सर्व कुटुंबियांनी मिळून एक फोटो काढला आणि तो फेसबुकवर अपलोड केला होता. भाजपने तोच फोटो उचलून जाहीरातीमध्ये टाकल्याचा आरोप चिले कुटुंबियांनी केला आहे.

'मोदी है तो मुमकीन है' जाहिरातीतील कुटुंब

मोदी सरकारच्या योजनेचे लाभार्थी म्हणून चिले कुटुंबियांचा फोटो वापरण्यात आला होता. या कुटुंबाचा आणि योजनेचा काहीही संबंध नसल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत सांगितले. त्याचबरोबर हे कुटुंब त्यांनी मंचावर बोलावून सरकारच्या खोट्या जाहिरातीचा पर्दाफाश केला. यानंतर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने या कुटुंबियांसोबत बातचित केली. यावेळी या कुटुंबाने आम्ही सरकारच्या कुठल्याही योजनचे लाभार्थी नसून सरकार खोटारडे असल्याचा आरोप केला. तसेच जनतेनीच या खोटारड्या सरकारचा निकाल लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यापूर्वीही राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत मोदी सरकारच्या डिजीटल इंडियाचे वाभाडे काढत 'हरिसाल' या डिजीटल गावाची पोलखोल केली होती. तसेच या जाहिरातीमधील मॉडेल मंचावर उभा करून तो सध्या तो रोजगाराच्या शोधात फिरत असल्याचे सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details