मुंबई- पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागात पुढील दोन दिवसात हलका पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात बदल होत आहे. त्याचबरोबर, तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे वेध शाळेच्या उपमहानिर्देशिका शुभांगी भुते यांनी सांगितले आहे.
24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज
24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात हलका पाऊस पडेल. त्याचबरोबर, २५ डिसेंबरला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात हलका पाऊस पडेल. त्याचबरोबर, २५ डिसेंबरला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांना पावसाचा अनुभव घेता येणार आहे. मुंबई व आजूबाजूच्या भागात पाऊस पडणार नसल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पूर्वेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात बदल होत आहे. तापमानात काही प्रमाणात वाढ होईल आणि पुढील दोन ते तीन दिवस तापमान असेच राहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याच्या प्रभाव आणखी काही दिवस राहील, अशी माहिती देखील वेध शाळेच्या उपमहानिर्देशिका शुभांगी भुते यांनी दिली आहे.
हेही वाचा-'राज्य महिला आयोगाची पुनर्रचना करा'