मुंबई- शहरात मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा रेल्वे सेवेबरोबरच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
मुंबईत मुसळधार : पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली - पश्चिम द्रुतगती
मुंबईतील महत्त्वाचे मार्ग असलेले पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली
मुंबईतील महत्त्वाचे मार्ग असलेले पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच किंग सर्कल, जोगेश्वरी लिंक रोड या ठिकाणीही पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ऐन गणेशोत्सवात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणा-दाण उडाली आहे. तर येत्या 4 दिवसांत पाऊस कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.