महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत पावसाची संततधार, सखल भागाला तळ्याचे स्वरूप - मुंबई पाऊस

मध्यरात्रीपासुन शहरात पावसाच्या सरी बरसत असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे दादर, माटुंगा, गांधी मार्केट, कुलाबा परिसरात पाणी साचले असुन उपनगरातील अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरीवली भागातही सखल परिसरात पाणी साचले आहे. यामुळे चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

rain-started-in-mumbai-stagnant-water-in-many-areas
मुंबईत पावसाची संततधार, अनेक परिसरात साचले पाणी

By

Published : Jul 3, 2020, 1:31 PM IST

मुंबई - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सायन, दादर, माटुंगा, गांधी मार्केट, कुलाबा परिसरात पाणी साचले असून उपनगरातील अंधेरी, कांदिवली, मलाड, बोरीवली भागातही सखल परिसरात पाणी साचले आहे.

कोरोनावरील उपचारांसाठी अवाजवी बील घेणे पडले महागात; 'या' प्रसिद्ध रुग्णालया विरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्रात जून महिन्यात मान्सुन वेळेवर दाखल झाला. मात्र, मुंबई-ठाण्यात हलक्या पावसाच्या सरीखेरीज मुसळारा बरसल्या नव्हत्या. दरम्यान,गुरुवारी हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात पावसाचा अदांज वर्तविला होता. त्यानुसार काल मध्यरात्रीपासुन शहरात पावसाच्या सरी बरसत असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे दादर, माटुंगा, गांधी मार्केट, कुलाबा परिसरात पाणी साचले असुन उपनगरातील अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरीवली भागातही सखल परिसरात पाणी साचले आहे. यामुळे चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, जून महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details