मुंबई - आज (शुक्रवारी) पुन्हा पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. येथील कुलाबा येथे गेल्या 24 तासांत 81 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 3.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी सायन, माटुंगा, दादर भागात जोरदार पाऊस पडल्याने गांधी मार्केट, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.
मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, वाहतूक मंदावली
आज (शुक्रवारी) पुन्हा पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. येथील कुलाबा येथे गेल्या 24 तासांत 81 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 3.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी सायन, माटुंगा, दादर भागात जोरदार पाऊस पडल्याने गांधी मार्केट, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे.
मुंबईत पुन्हा पावसाची हजेरी, वाहतूक मंदावली
हेही वाचा -देशातील एकमेव गांधी भवन, जिथे रोज आयोजित होते 'गांधी भजन'...
तसेच बेस्टच्या या मार्गावरील बस इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच हवामान खात्याने गुरुवार ते शनिवार मुसळधार पाऊस पडेल व या कालावधीत 250 ते 300 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.