मुंबई - मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात बुधवारी रात्री एक चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीमध्ये अडकलेल्यांचा शोध व बचाव कार्य सुरू असल्याची माहिती ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान जवळच्या ३ धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
Mumbai Rains Live : मालाड येथे इमारत कोसळल्यामुळे नऊ ठार; आठ जण जखमी - Weather Forecast news
05:54 June 10
मालाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू; आठ जण जखमी
00:59 June 10
मालाड मालवणी येथे एक मजली घर शेजारच्या घरावर कोसळले; ५ जणांना सुखरूप बाहेर काढले
मुंबई -मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पावसानंतर मालाड मालवणी येथील एक मजली घर जवळच्या घरावर कोसळले. यामुळे बाजूला असलेल्या एका चार मजली धोकादायक इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने ही इमारत खाली केली जात आहे. या घटनेत आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ५ जणांना बाहेर सुखरूप काढण्यात आले असून कोणीही जखमी झाले नाही. अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
22:16 June 09
पहिल्या पावसातच बेस्ट बस गळू लागली
मुंबई - पाऊस आला की मुंबईमध्ये दरवर्षी सखल भागांमध्ये पाणी तुंबत असतं. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतो. मात्र, आज मुंबईच्या अनेक सखल नसलेल्या भागातही पाणी साचले आहे. मंगळवार(8 जून) रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशात बेस्ट बसला देखील गळती लागली आहे. बेस्ट बसच्या ताफ्यात मिनी एसी बसेस आहेत. यातील एक बस चक्क पावसामुळे गळू लागली आहे. तर बसचा चालक छत्री घेऊन ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवत आहे.
20:26 June 09
लोकल सेवा पूर्वपदावर; सीएसएमटीपासून 9.30 तासानंतर पहिली लोकल सुटली
मुंबई - पावसामुळे ठप्प झालेली लोकल सेवा 9.30 तासांनी पुन्हा सुरू झाली आहे. सीएसएमटीवरून सायंकाळी 7.46 वाजेची टिटवाळा लोकल सुटली आहे. तर, त्यानंतर सायंकाळी 7.45 ची ठाणे लोकलदेखील सुटली.
20:06 June 09
रस्त्याची झाली नदी, तुंबलेल्या पाण्यात सापडले मासे
मुंबई - मंगळवारच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. तसेच, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. 'ईस्टर्न फ्री वे'वरून सीएसटीच्या दिशेने प्रवास करत असताना, शिवडीच्या थोडं पुढे चक्कं तुंबलेल्या पाण्यात मासे दिसून आले.
19:52 June 09
मिठी नदी ओव्हरफ्लो; इमारतींमध्ये शिरलं पाणी
मुंबई -मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. कुर्ला येथील मिठी नदीचे पाणी जवळपास राहणाऱ्या इमारती, घरांमध्ये शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिठी नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने.काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षी नदीतला गाळ काढला जातो. या वर्षी साधारण 70 टक्के गाळ काढला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती.
19:18 June 09
सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्या
मुंबई - गाडी क्रमांक 02362 सीएसएमटी ते आसनसोल विशेष एक्स्प्रेस सकाळी 11.05 ऐवजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. गाडी क्रमांक 02598 सीएसएमटी- गोरखपुर विशेष एक्स्प्रेस दुपारी 1.30 वाजता ऐवजी दुपारी 3.30 वाजता सुटेल, गाडी क्रमांक 01019 सीएसएमटी ते भुनेश्वर विशेष एक्स्प्रेस ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल, 07031 गाडी क्रमांक सीएसएमटी- हेंद्राबाद विशेष एक्स्प्रेस ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल, गाडी क्रमांक 02701 गाडी क्रमांक सीएसएमटी- हेंद्राबाद विशेष एक्स्प्रेस मध्य रात्री १२ वाजून १० मिनिटांनी सुटेल, गाडी क्रमांक 02322 सीएसएमटी -हावडा विशेष एक्स्प्रेसमध्य रात्री २ वाजता सुटेल, गाडी क्रमांक 02193 सीएसएमटी- वाराणसी विशेष एक्स्प्रेस पहाटे ४ वाजता सुटेल, गाडी क्रमांक 00113 सीएसएमटी -शालिमार पार्सल ट्रेन सकाळी ८ वाजता सुटेल.
19:17 June 09
मेल- एक्स्प्रेस गाड्या रद्द -
मुंबई - शहर आणि उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला. रात्रीपासून मुंबईत मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना याचा फटका बसला. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेल-एक्सप्रेस सेवांवर मोठा परिणाम झाला. अनेक रेल्वे गाडयांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत तर मुंबईतून सुटणाऱ्या सीएसएमटी-आसनसोल विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी- हैदराबाद विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी -हावडा विशेष एक्स्प्रेस सारख्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्या आहेत. काही मेल- एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
18:35 June 09
मुंबईत पावसाची विश्रांती
मुंबई - पावसाची विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईकरांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईमधील पावसाचे साचलेले पाणी समुद्रात सोडायला सुरुवात केली आहे. तसेच रेड अलर्टही हवामान विभागाने दिला आहे.
18:19 June 09
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज रेड अलर्ट
मुंबई - पावसाच्या पार्श्वभूमीवर आज(9 जून) मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार दिवस या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
18:06 June 09
प्रतिक्षानगर डेपोपासून आढावा घेताना प्रतिनिधी
मुंबई-मंगळवारपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिक्षानगर डेपो येथून आढावा घेताना ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी...
17:05 June 09
पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पालिका मुख्यालयात
मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पावसाचा आढावा घेतला आहे. त्यांच्यासोबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात येत पावसाच्या स्थितीची माहिती घेतली.
16:47 June 09
मुंबईची रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई - सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्यामुळे मुलुंडपासून सीएसएमटी दिशेने आणि ठाणेच्या दिशेने जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. सकाळी 09:38 नंतर एकही लोकल ही सीएसएमटीच्या दिशेने रवाना झाली नाही. याचा फटका अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. फलाटांवर हे कर्मचारी लोकलची वाट पाहत उभे होते. परंतु लोकल सेवा ही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
16:20 June 09
पुढील चार दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबई - मंगळवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आज रात्रीदेखील मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण किनारपट्टीवरदेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
16:19 June 09
मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट
मुंबई -मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट मुंबई जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
15:29 June 09
मुंबईत मुसळधार पाऊस! कुर्ला येथून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
मुंबई - महानगरपालिकेचा दावा फोल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. कुर्ला परिसरातून प्रतिनिधी विशाल सवणे यांनी घेतलेला आढावा...
15:22 June 09
पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे रवाना
मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे आजच्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात येत आहेत.
15:20 June 09
आज मुंबईची तुंबई झाली, मुंबईत पाणी भरून 'दाखवलं - दरेकर
मुंबई -२०१७ मध्ये मुंबईत पाणी तुंबल्यास मुख्यमंत्री जबाबदार, असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं. मग आज मुंबईत पाणी भरलं त्याला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार का?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विचारला आहे.
15:09 June 09
गेट वे ऑफ इंडिया परिसरात पावसाचे पाणी साचले
मुंबई - आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसरातही पावसामुळे पाणी साचले आहे.
14:57 June 09
पावसाचा विमान सेवेला फटका
मुंबई- पावसामुळे आणि धुकट हवामानामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. याचा विमान सेवेवरसुद्धा काही प्रमाणात परिणाम दिसून आला आहे. अनेक विमानं मुंबईतून १५ ते २० मिनिटांनी विलंबाने उड्डाण करत आहेत. तर मुंबईत येणाऱ्या विमानांच्या आकाशात घिरट्या घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
14:04 June 09
मुंबईत पाणी साचणार नाही असं कधीच बोलले नाही - महापौर
14:03 June 09
मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकरांनी आढावा घेतला. त्यांनी पालिकेच्या आपत्कालील व्यवस्थापन विभागाला भेट दिली.
14:02 June 09
ठाण्याच्या पुढे लोकल रद्द
14:02 June 09
कसारा, कर्जत आणि कल्याणच्या दिशेला लोकल सुरू राहणार
14:01 June 09
सायन कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी भरल्याने लोकल रद्द
14:01 June 09
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल रद्द
12:41 June 09
ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात.
12:32 June 09
मुंबई -मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या आज सुटणाऱ्या 02362 सीएसएमटी ते आसनसोल विशेष एक्स्प्रेस आणि 02598 सीएसएमटी-गोरखपुर विशेष एक्स्प्रेसच्या वेळेत बदल केला आहे. तर मुंबई येणाऱ्या अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांना कल्याण आणि ठाण्याला शॉर्ट टर्मिनेट केलेल्या आहेत.
12:14 June 09
मुंबई - पश्चिम रेल्वेची सेवा व्यवस्थित सुरू आहे. वांद्रे येथे हार्बर रुळांवर पाणी साचले होते. मात्र, लगेच तेथे पंप सुरू करून पाणी उपसण्यात आल्या असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल सेवेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहे.
11:45 June 09
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय लोकल सेवेला फटका बसला आहे. सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा संथ गतीने सुरू आहे. तसेच अनेक गाड्या पंधरा ते वीस मिनिटानी उशिराने धावत आहे.
11:45 June 09
अद्यापही पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईच्या सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. समुद्राला सकाळी 11.43 वाजता 4.16 मीटरची भरती असल्याने यावेळेत मोठा पाऊस पडल्यास शहरातील सखल भागात पाणी साचून राहणार आहे. याचा फटका रस्ते, रेल्वे वाहतुकीला बसू शकतो तसेच नागरिकांनाही त्याचा त्रास होणार आहे.
१०४ टक्के नालेसफाई -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यंदा नालेसफाई दरम्यान मे अखेरपर्यंत मोठया नाल्यांमधून ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ३ लाख २४ हजार २८४ मेट्रिक टन इतका म्हणजे १२ हजार ९०३ मेट्रिक टन जास्त काढला आहे. यंदा मोठ्या नाल्यातून १०४ टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय लोकल सेवेला फटका बसला आहे. सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा संथ गतीने सुरू आहे. तसेच अनेक गाड्या पंधरा ते वीस मिनिटानी उशिराने धावत आहे.
11:45 June 09
सखल भागात पाणी साचले -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होते. यावर्षी मोठ्या नाल्यांची 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासन आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. हा दावा करून काही तासच झाले असताना हा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे. मुंबईत रात्रीपासून पडत आहे. गेल्या 24 तासात 8 जून ते 9 जून सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात मुंबईत शहर विभागात 48.49 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 66.99 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 48.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
11:21 June 09
मुंबई -मुंबईत पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल विभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. यामुळे पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.