मुंबई -दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस अद्याप देखील थांबलेला नाही. त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता ( torrential rain ) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या ( Maharashtra Rain Update ) इशाऱ्याच गांभीर्य लक्षात घेत मुंबई व मुंबई उपनगरासह कोकण किनारपट्टीच्या भागात ( NDRF )च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. (Mumbai Heavy Rain )
मुंबईत 5 टीम तैनात -दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचत. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. (Maharashtra Rain Update ) त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली -कोकणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच चिपळूणच्या परिस्थितीकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सोमवारी सकाळपासून पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Maharashtra Rain Update ) कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )
मुंबई व्यतिरिक्त या भागात NDRF तैनात -मागील वर्षी पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील महाड तसेच चिपळूण शहराला पुराचा जोरदार फटका बसला होता. चिपळूणातील पूरस्थिती आटोक्याबाहेर गेली होती. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचरण करण्यात आलं होतं. पुराचं पाणी घरात दुकानात शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं. ( Maharashtra Rain Update ) मागील वर्षाची स्थिती लक्षात घेता आधीच दक्षता म्हणून चिपळूण शहरात एन ए डी आर एफची एक टीम तैनात करण्यात आली आहे. तर, एक तुकडी महाड शहरात तैनात करण्यात आली आहे. उर्वरित एक तुकडी रत्नागिरी शहरात तैनात आहे. संभाव्य धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास या टीम आवश्यक त्या ठिकाणी आपली सेवा देतील. ( Mumbai Heavy Rain )