महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Plastic Free Environment : प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी रेल्वेकडून कागदी पिशव्यात खाद्यपदार्थांची विक्री

प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी रेल्वेकडून नवा उपक्रम सुरू करण्यात आला ( unique initiative for plastic free environment ) आहे. कागदी पिशव्यात खाद्यपदार्थांची विक्री सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या पाऊचमधील खाद्यपदार्थ कागदाच्या पिशवीमध्ये भरून ग्राहकाला दिली जात (Food in paper bag ) आहेत.

Plastic Free Environment
कागदी पिशव्यात खाद्यपदार्थांची विक्री

By

Published : Dec 16, 2022, 8:17 PM IST

कागदी पिशव्यात खाद्यपदार्थांची विक्री

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी अनोखा उपक्रम सुरू केला ( unique initiative for plastic free environment ) आहे. रेल्वे परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांना फाटा देत खाद्यपदार्थ अगदी पिशवीमध्ये देण्याची मोहीम सुरू केली (Food in paper bag ) आहे.


डिजिटल राइट्स मॅनेजमेंट : स्थानकांवरील कॅटरिंग स्टॉल्सवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल राइट्स मॅनेजमेंट मुंबईने प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ देण्यासाठी/विक्री करण्यासाठी निर्देश दिला ( food Sale in paper bags ) आहे. त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या स्टॉल वरील कामगाराने प्लास्टिकच्या पाऊचमधील खाद्यपदार्थ कागदाच्या पिशवीमध्ये भरून ग्राहकाला दिली.

सफाई योद्धा'चा दर्जा : सर्व स्टॉल्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'सफाई योद्धा'चा दर्जा देण्यात आला असून त्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यासोबतच आमच्या आदरणीय ग्राहकांनाही या मोहिमेत विविध माध्यमांतून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईलच शिवाय पावसाळ्यात ड्रेनेज सिस्टीममध्ये आडकण्याने प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पाणी साचण्याची समस्याही दूर होईल.

रेल्वे वरिष्ठांनी मोहीम हाती घेतली : या संदर्भात रेल्वेस्टॉलवरील कामगार जनकराम याने सांगितले की "डीआरएम कार्यालयाने ही मोहीम सुरू करायला सांगितले आहे आम्ही त्याचे पालन करत आहोत प्लास्टिक हटाव आणि पर्यावरण बचाव यासाठी कागदाच्या पिशवीतून आम्ही खाद्यपदार्थ देत आहोत." मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांच्यासोबत संवाद साधला असता धन्य खुलासा केला की "या प्रकारची मोहीम नुकतीच सुरू झालेली आहे. कागदी पिशव्यांचा वापर वाढावा प्रदूषण टाळावे यासाठी खास रेल्वे वरिष्ठांनी मोहीम हाती घेतलेली आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details