मुंबई :सार्वजनिक ठिकाणी अपंगांना विशेष सवलत दिली गेलेली आहे. त्यातील लोकलचे रेल्वे डबे यामध्ये देखील अपंगांच्यासाठी विशेष डब्यांची सोय आहे. मात्र अपंगांच्या डब्यात बिगर अपंग असलेले सामान्य प्रवासी कधी नकळत तर कधी जाणीवपूर्वक घुसतात, असे रेल्वेच्या निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलिसांच्या मार्फत विशेष मोहीम सुरू केली (Railways Special Pampaign) आहे. यात हजारो प्रवाश्यांवर कारवाई केली (encroachment of disabled coaches) गेली.
Railways Special Pampaign : सक्षम असूनही अपंगांच्या डब्यात प्रवास करताय ? बसू शकतो भूर्दंड ; रेल्वेची धडक मोहीम - आतापर्यंत हजारो प्रवाश्यांवर कारवाई - campaign against encroachment of disabled coaches
लोकलचे रेल्वे डबे यामध्ये देखील अपंगांच्यासाठी विशेष डब्यांची सोय आहे. मात्र अपंगांच्या डब्यात बिगर अपंग असलेले सामान्य प्रवासी कधी नकळत तर कधी जाणीवपूर्वक घुसतात, असे रेल्वेच्या निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलिसांच्या मार्फत विशेष मोहीम सुरू केली (Railways Special Pampaign) आहे. यात हजारो प्रवाश्यांवर कारवाई केली (encroachment of disabled coaches) गेली.
![Railways Special Pampaign : सक्षम असूनही अपंगांच्या डब्यात प्रवास करताय ? बसू शकतो भूर्दंड ; रेल्वेची धडक मोहीम - आतापर्यंत हजारो प्रवाश्यांवर कारवाई Railways Special Pampaign](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16776207-thumbnail-3x2-railway.jpg)
अपंगांच्या डब्यात सक्षम प्रवासी :अपंगांच्यासाठी 1996 च्या समान संधी कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी त्यांना विनाअडथळा प्रवास करण्यासाठी खास सोय बस, रेल्वे, विमान, या ठिकाणी असायला हवी, असा नियम (Railways disabled coaches) आहे. तसेच सार्वजनिक प्रसाधनगृह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अक्षम व्यक्तींना सहज वावर करता येईल, या रीतीने त्यांच्यासाठी खास सवलत केलेली आहे. मुंबईच्या लोकल डब्यामध्ये देखील अपंगांसाठी खास डब्यांची रचना केलेली आहे. मात्र या डब्यांमध्ये इतरच प्रवास करतात. अश्या घटना वारंवार घडू लागल्या. जानेवारी 2022 ते आक्टोंबर 2022 या कालावधीत आठ हजारपेक्षा अधिक बिगर अक्षम प्रवासी घुसल्याचे रेल्वे प्रशासनाला आढळले. आणि या प्रवाशांकडून सुमारे 29 लाख एवढा दंड रेल्वेने वसूल केला (special campaign against encroachment) आहे.
अशा रीतीने कारवाई :यासंदर्भात दिव्यांग संस्थेचे राम पाटणकर यांच्याशी ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की - रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी आणि अपंग प्रवासी यांनी संयुक्तरित्या व्हाट्सअप गट तयार केला. रोजचे दिव्यांग प्रवासी कोण ? याची माहिती एकमेकांना असते. मात्र ही माहिती रेल्वेच्या पोलिसांना मिळावी, यासाठी हा संयुक्त ग्रुप तयार केला. यामध्ये बिगर अक्षम व्यक्ती डब्यात घुसल्यास त्यांचा फोटो त्यांची सविस्तर माहिती या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठवणे सुरू झाले. आणि रेल्वे सुरक्षा कर्मचारी तत्काळ संबंधित डब्यात त्या रेल्वे स्थानकात पोहोचतात. आणि बिगर रक्षण प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे या दहा महिन्यात या मोहिमेला खूप वेग आलेला आहे. त्यामुळे अक्षम व्यक्तींच्या डब्यात सर्वसाधारण प्रवासी चढण्याचा घटनांवर आता लगाम येत (Railway Administration) आहे.